eKYC मुदतीचा घोळ, कोट्यवधी महिला चिंतित, मंत्री अदिती तटकरेंचे मोठे विधान | Ladki Bahin Yojana eKYC
- 2025.11.06
- セキュリティ
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे. यावर बोलताना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ‘लाभार्थ्यांची ईकेवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल.’. योजनेच्या कोट्यवधी संभाव्य लाभार्थ्यांपैकी अनेकांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही, ज्यामुळे महिला आणि बालविकास विभागासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, परंतु सर्व्हरच्या तांत्रिक समस्यांमुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे ही मुदत वाढवून देण्याबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#LadkiBahinYojana #eKYC #AditiTatkare #Maharashtra #GovScheme #Deadline #TechGlitch #WomenEmpowerment #MaziLadkiBahinYojana #NewsUpdate